नवरात्रोत्सवानिमित्त विविध सार्वजनिक मंडळांना आफरीन सैय्यद यांनी दिली सदिच्छा भेट
17-April-2026
संगमनेर युवक काँग्रेस आणि NSUI यांच्या माध्यमातून “युवा संगम” नेतृत्व प्रशिक्षण आणि संवाद कार्यक्रमाचे
यावेळी युवकांशी संवाद साधताना लोकशाही, वारकरी संप्रदायाची परंपरा तसेच समता, बंधुता व मानवता या राज्यघटनेतील मूल्यांवर भर देत काँग्रेसचा सर्वसमावेशक विचार अधोरेखित करण्यात आला. डॉ. जयश्री थोरात व सर्व युवक यांच्या माध्यमातून आयोजित या दोन दिवसीय शिबिरातून युवकांना प्रभावी व्यासपीठ मिळणार आहे.
12-May-2026
भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष मा. उदय भानू चिब यांच्या प्रमुख उपस्थितीत मीरा भाईंदर येथे “युवा मिलाप २०२६” कार्यक्रम उत्साहात आणि मोठ्या प्रतिसादात संपन्न झाला
यावेळी १० वी आणि १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पार पडला तसेच “आवाज महाराष्ट्राचा, मीरा भाईंदरच्या परिवर्तनाचा” या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. “गिग वर्कर्स न्याय अभियान” अंतर्गत गिग वर्कर्सच्या हक्क, सुरक्षा आणि सामाजिक संरक्षणासाठी ठोस भूमिका मांडण्यात आली.
या कार्यक्रमाला भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव अजय छिकारा, राष्ट्रीय सहसचिव शांभवी शुक्ला, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आनंद सिंग, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष दिप्तेश परब, अनुराग भोयर, कपिल ढोके, प्रथमेश अबनावे, आमेर अब्दुल सलीम तसेच महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे संघटन महासचिव प्रवीणकुमार बिरादार हे प्रमुख उपस्थित होते.
युवक सक्षमीकरण, नागरिकांच्या प्रश्नांवर आवाज आणि परिवर्तनासाठीची ही लढाई अधिक मजबूत करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
01-February-2026
Attended the ASMITA Cricket Premier League 2026
Heartiest congratulations to the champions and kudos to every player who made this tournament memorable.
15-February-2026
काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेवकांसोबत संगमनेर येथे महाराष्ट्राचे माजी महसूल व कृषी मंत्री, ज्येष्ठ नेते आणि आमचे मार्गदर्शक श्री.बाळासाहेब थोरात जी यांची सदिच्छा भेट घेतली.
थोरात साहेबांच्या समृद्ध राजकीय अनुभवातून आणि विकासाभिमुख दृष्टिकोनातून स्थानिक विकासाला गती देण्यासाठी तसेच शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी एकत्रितपणे काम करण्याबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन नगरसेवक व कार्यकर्त्यांना मिळाले.
26-January-2026
७७ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने प्रभागात ध्वजवंदन करण्यात आले.
03-September-2026
रक्षाबंधनानिमित्त महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांचे औक्षण करून हातावर आपुलकीची राखी बांधली.
25-January-2026
एक शानदार और यादगार शाम – महफ़िल-ए-मुशायरा उर्दू अदब का ख़ज़ाना
उर्दू अदब की ख़ूबसूरत तुकबंदी और शेर-ओ-शायरी ने दिलों को छू लिया। इस ख़ास महफ़िल की रौनक मशहूर शायर इमरान प्रतापगढ़ी की मौजूदगी से और भी बढ़ गई।
यह यादगार कार्यक्रम उर्दू साहित्य के अमूल्य ख़ज़ाने को ख़ूबसूरती से सभी के सामने लेकर आया। इस आयोजन को सफल बनाने वाले तमाम शायरों और साहित्य-प्रेमियों का दिल से धन्यवाद।
08-September-2026
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री मा. सुनील केदार यांची नागपूर येथे सदिच्छा भेट घेतली.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री मा. सुनील केदार यांची नागपूर येथे सदिच्छा भेट घेतली. तसेच कामठी शहर काँग्रेस कमिटीच्या सर्वे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी युवक काँग्रेस ग्रामीणचे सर्वे विधानसभा पदाधिकारी उपस्थित होते.
09-September-2026
नागपूर दौ-यादरम्यान महाराष्ट्र पोलीस आयुक्तालय येथे वरिष्ठ आयपीएस अधिकारी
नागपूर दौ-यादरम्यान महाराष्ट्र पोलीस आयुक्तालय येथे वरिष्ठ आयपीएस अधिकारी, नागपूर पोलीस आयुक्त श्री.विश्वास नांगरे पाटील यांची महाराष्ट्र युवक कॉंग्रेस कमिटीच्या पदाधिका-यांसोबत सदिच्छा भेट घेतली.
12-May-2026
Yuva मिलाप 2026
भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष मा. उदय भानू चिब यांच्या प्रमुख उपस्थितीत मीरा भाईंदर येथे “युवा मिलाप २०२६” कार्यक्रम उत्साहात आणि मोठ्या प्रतिसादात संपन्न झाला. यावेळी १० वी आणि १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पार पडला तसेच “आवाज महाराष्ट्राचा, मीरा भाईंदरच्या परिवर्तनाचा” या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. “गिग वर्कर्स न्याय अभियान” अंतर्गत गिग वर्कर्सच्या हक्क, सुरक्षा आणि सामाजिक संरक्षणासाठी ठोस भूमिका मांडण्यात आली.
या कार्यक्रमाला भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव अजय छिकारा, राष्ट्रीय सहसचिव शांभवी शुक्ला, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आनंद सिंग, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष दिप्तेश परब, अनुराग भोयर, कपिल ढोके, प्रथमेश अबनावे, आमेर अब्दुल सलीम तसेच महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे संघटन महासचिव प्रवीणकुमार बिरादार हे प्रमुख उपस्थित होते.
युवक सक्षमीकरण, नागरिकांच्या प्रश्नांवर आवाज आणि परिवर्तनासाठीची ही लढाई अधिक मजबूत करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
15-August-2026
भारताच्या ८०व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मिरा-भाईंदर शहरात विविध ठिकाणी आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित राहून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.
भारताच्या ८०व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मिरा-भाईंदर महानगरपालिका मुख्यालय, मनपा उर्दू शाळा क्र.३४, पूनम सागर, अस्मिता समीर को.ॲाप.हौ.सोसायटी, शम्स मस्जिद नया नगर या विविध ठिकाणी आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित राहून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी उपस्थितांसोबत स्वातंत्र्यदिनाचा उत्साह अनुभवत सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
02-September-2026
महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले लोकसभेतील विरोधी पक्षनेते, युवा नेतृत्व, जननायक मा. श्री. राहुल गांधी जी यांची सदिच्छा भेट
महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले लोकसभेतील विरोधी पक्षनेते, युवा नेतृत्व, जननायक मा. श्री. राहुल गांधी जी यांचे नाशिक विमानतळावर आगमन झाल्यानंतर स्वागत केले.