Mira Bhayandar Empowering Women Club

Syed Affreen Muzaffar Hussain, Corporator of Mira Bhayandar, leads the Empowering Women Club, an initiative dedicated to uplifting women by fostering confidence, skill development, and opportunities. The club works towards supporting women’s growth and creating a stronger, more inclusive community.

महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले लोकसभेतील विरोधी पक्षनेते, युवा नेतृत्व, जननायक मा. श्री. राहुल गांधी जी यांची सदिच्छा भेट

महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले लोकसभेतील विरोधी पक्षनेते, युवा नेतृत्व, जननायक मा. श्री. राहुल गांधी जी यांचे नाशिक विमानतळावर आगमन झाल्यानंतर स्वागत केले.

भारताच्या ८०व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मिरा-भाईंदर शहरात विविध ठिकाणी आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित राहून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

भारताच्या ८०व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मिरा-भाईंदर महानगरपालिका मुख्यालय, मनपा उर्दू शाळा क्र.३४, पूनम सागर, अस्मिता समीर को.ॲाप.हौ.सोसायटी, शम्स मस्जिद नया नगर या विविध ठिकाणी आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित राहून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी उपस्थितांसोबत स्वातंत्र्यदिनाचा उत्साह अनुभवत सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Yuva मिलाप 2026

भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष मा. उदय भानू चिब यांच्या प्रमुख उपस्थितीत मीरा भाईंदर येथे “युवा मिलाप २०२६” कार्यक्रम उत्साहात आणि मोठ्या प्रतिसादात संपन्न झाला.यावेळी १० वी आणि १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पार पडला तसेच “आवाज महाराष्ट्राचा, मीरा भाईंदरच्या परिवर्तनाचा” या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. “गिग वर्कर्स न्याय अभियान” अंतर्गत गिग वर्कर्सच्या हक्क, सुरक्षा आणि सामाजिक संरक्षणासाठी ठोस भूमिका मांडण्यात आली.

या कार्यक्रमाला भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव अजय छिकारा, राष्ट्रीय सहसचिव शांभवी शुक्ला, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आनंद सिंग, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष दिप्तेश परब, अनुराग भोयर, कपिल ढोके, प्रथमेश अबनावे, आमेर अब्दुल सलीम तसेच महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे संघटन महासचिव प्रवीणकुमार बिरादार हे प्रमुख उपस्थित होते.

युवक सक्षमीकरण, नागरिकांच्या प्रश्नांवर आवाज आणि परिवर्तनासाठीची ही लढाई अधिक मजबूत करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.